सीधे मुख्य सामग्री पर जाएं

मन्थन चा पारितोषिक वितरण सोहळा थाटात



यजन् बहूद्देशीय संस्था व गो. से. महाविद्यालय संस्कृत विभाग यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित मन्थन जिल्हास्तरिय संस्कृत प्रतियोगितेचे पारितोषिक वितरण गो. से. महाविद्यालय खामगाव येथे दि. १७/०९/२३ रोजी उत्साह व चैतन्यपूर्ण वातावरणात पार पडले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्री. अशोकजी झुनझुनवाला यांनी भूषवले. कार्यकमासाठी मुख्य अतिथि म्हणून श्री. प्रकाशजी मुकुंद, शिक्षणाधिकारी (माध्यामिक) जि.प. बुलढाणा व श्री. क्षितिजजी अनोकार शासकीय अधिवक्ता यांची उपस्थिती लाभली. गो. से. महाविद्यालचे उपप्राचार्य श्री. प्रफुल्ल उबाळे सर , संस्कृत विभाग प्रमुख प्रा. सौ. संगिता वायचाळ, मन्थनचे प्रकल्पप्रमुख श्री मधुकर आटोळे यांची मंचावर उपस्थिती होती . 

प्रतियोगितेच्या पारितोषिकांसाठी ( स्व. श्री हेमंत उर्फ राजाभाऊ देशमुख यांचे स्मृतिप्रीत्यर्थ) श्री. अनंत देशमुख, श्री दुर्गेश अनोकार ,( श्री. अरविंद नेटके यांचे यांचे स्मृतिप्रीत्यर्थ)  सौ रसिका जोशी , ( स्व. श्री हेमंत उर्फ राजाभाऊ देशमुख यांचे स्मृतिप्रीत्यर्थ) श्री. मोहन कवळे, श्री. राजेन्द्र चिम , श्री. गिरिष पैठणकर  यांचे कडून अर्थसहाय्य लाभले. 

सत्यम् (वर्ग १ ते ५), शिवम् (वर्ग ६ ते १०) सुन्दरम् (खूला गट) व मधुरम् (शिशुवर्ग) अश्या चार गटात प्रतियोगिता होती. एकूण ९१२ स्पर्धक सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी सुंदर राम, कृष्ण व इतर वेष धारण करत संस्कृत श्लोक गात व्हिडिओ पाठवलेत.

यजन बहुउद्देशीय संस्था आणि गो से विज्ञान कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगाव च्या संस्कृत विभागाच्या य संयुक्त विद्यमाने मंथन जिल्हास्तरीय संस्कृत प्रतियोगितेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाचे वि .शि.प्र. मंडळ खामगाव चे उपाध्यक्ष श्री अशोक जी झुंझुनवाला हे होते. मुख्य अतिथी म्हणून श्री प्रकाशजी मुकुंद शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद बुलढाणा हे होते. इंग्रजी माध्यमातील शिक्षण भौतिकतेच्या दृष्टीने उपयुक्त असले. आजच्या जगात  पैसा देणारे असले तरी त्या मावशीपेक्षा आपली माय माऊली केव्हाही श्रेष्ठ, कारण मातृभाषेतून दिले जाणारे शिक्षण हे मूल्य संस्कार घडवण्यात अधिक उपयुक्त ठरतं हे त्यांनी शिवाजी महाराजांच्या कथेतून सोदाहरण स्पष्ट केले.


" संस्कृत ही ज्ञान भंडाराची भाषा आहे. संस्कृत ही प्राचीन वैभवशाली भारताची ज्ञानभाषा आहे आपण मात्र पूर्वजांनी दिलेला वारसा केवळ पूजना पुरता मर्यादित केलेला आहे .तो तसा न करता त्या ज्ञान भाषेचा त्यातील ज्ञान भांडारचा योग्य तो उपयोग करून घेतला पाहिजे असे श्री क्षितिज अनोकार म्हणाले. अध्यक्ष श्री अशोक जी झुनझुनवाला यांनी स्पष्ट केले की यजन बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक हे संस्कृत विभागाचे गो.से. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत त्यामुळे पालकत्त्वाच्या भावनेने गो.से महाविद्यालय या उपक्रमामध्ये संयुक्तरित्या सहभागी झाले होते. त्यासाठी त्यांनी आनंद व्यक्त केला आणि संस्थेला आशीर्वाद दिला. संपूर्ण भारतीय भाषा या 80% संस्कृतच आहेत त्यामुळे एखाद्याला संस्कृत बोलता येत नाही असं जर वाटत असेल तर तो त्याचा समज 80 टक्के खोटा आहे असे समजावे आणि हे लक्षात घ्यावे की प्रत्येकाच्या नसानसात संस्कृत आहेच.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्कृत विभाग प्रमुख सौ. संगीता वायचाळ यांनी केले. याच वेळेस विविध पारितोषिकांसाठी ज्यांचे अर्थसहाय्य लाभले त्या दानदात्यांचा , परीक्षकांचा, समन्वयकांचा सत्कार करण्यात आला.

मधूरं, सत्यं , शिवं, सुंदरम् गटाच्या पारितोषिक वितरणाची उद्घोषणा ऋध्वी पाटील यांनी केली. संचालन कु शरयू कुळकर्णी यांनी केले.

यावर्षीचा मानाचा संस्कृत संस्कृतयोधः हा पुरस्कार माऊली स्कूल ऑफ स्कॉलर्स शेगाव यांनी मिळवला (स्वरूप : संस्कृतयोधः चषक व सात हजार रुपये) या विद्यालयातील एकूण ३१७ विद्यार्थी सहभागी झाले होते.

प्रत्येक गटातील प्रथम पारितोषिक ५,००० ₹ द्वितीय पारितोषिक ३,०००₹ व तृतिय पारितोषिक २,००० ₹ होते . 

मधुरम् गटातिल तृतिय क्रमांकाचे पारितोषिक कु. टिशा पांडे व चि. प्रणित मोहता , द्वितिय क्रमांकाचे पारितोषिक अथर्व संतोष कुसुम्बळे व युग हरिष टिबडेवाल व प्रथम क्रमांकाचे पारितोषिक युवराज अंकित पुरवार व नमन हरिष पटेल यांना विभागून मिळाले 

सत्यम् गटाचे प्रोत्साहनपर चि. रियांश सुरेश शेलगावकर , कु.देवयाणी संदीप मसणे कु.गौरी निलेश निंबाळकर,  तृतिय क्रमांकाचे पारितोषिक कु.आराध्या गणेश ताकवाले, चि.आदित्य जोशी द्वितिय क्रमांकाचे पारितोषिक कु.वैष्णवी मोरे चि. संभाजी प्रशांत पाचपोर, प्रथम क्रमांकाचे पारितोषिक यांना चि.रुद्र शैलेन्द्र बगाडे ,कु.भक्ती ज्ञानेश्वर असम्बे यांना विभागून मिळाले.

शिवम्  गटाचे प्रोत्साहनपर पारितोषिक कु.कृष्णाली विश्वेश्वर तायडे ,कु.ऋचा गजानन देशमुख

कु. पियुषा रामराज जोशी  तृतिय क्रमांकाचे पारितोषिक कु.विधि प्रमोद वेरूळकार, कु.जयश्री बोबडे द्वितिय क्रमांकाचे पारितोषिक चि. गोविंदा शिवशंकर पारस्कर,कु.मैथिली हरीष पालडीवाल प्रथम क्रमांकाचे पारितोषिक चि.श्रीपाद संजय संत ,चि.राम मुकुटराव जवरे यांना विभागून मिळाले 

सुन्दरम् गटाचे तृतिय क्रमांकाचे पारितोषिक चि. तुहिन जोशी,कु. सायली धर्माधिकारी 

द्वितिय क्रमांकाचे पारितोषिक सौ. अनुजा भट्टड , कु. तेजश्री देशपांडे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक सौ पुजा तेरेदेसाई , ह.भ.प. सौ . सुरेखाताई माळी यांना विभागून मिळाले.

कार्यक्रमाच्या उत्कृष्ठ नियोजनाचे सर्वांनी कौतुक केले याचे श्रेय यजन् च्या विद्यार्थ्यांना जाते.

दै॰ लोकमत मधील वृत्त दि॰ १९ सप्टे २०२३


दै॰ देशोन्नती दि॰ २० सप्टे॰ २०२३

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

यजनची दिवाळी सातपुड्यातील वनवासी बांधवांसोबत

 यजनची दिवाळी सातपुड्यातील वनवासी बांधवांसोबत विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक सलोख्याची भावना वृद्धिंगत व्हावी या हेतूने दि॰ ११ नोव्हे २०२३ रोजी यजन बहूद्देशीय संस्थेतर्फे वनवासी बांधवांसोबत दिवाळीचे फराळ व भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले.  ठिकाण - सातपुड्यातील वडपाणी पाडा व सलाईबल परिसर

श्रीगुरवे नमः

 गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात्परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः॥